उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 3 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून त्यातील तब्बल 2रुग्ण हे परांडा येथील सोलापूर रिटर्न आहेत तर 1 रुग्ण हा नळदुर्ग येथील आहे . नळदुर्ग येथील रुग्ण पूर्वीच्या संपर्क आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज 11 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 5निगेटीव्ह आले तर 3पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 142झाली असून त्यापैकी 99 जण बरे झाले आहेत तर 40 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 3 जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत.