उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णाचा आकडा वाढत असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कोरोना प्रतिबंधात्मक आदेश काढले असून यापुढे सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी गर्दी केल्यास १ हजाराचा दंड ठोठावला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिरासह इतर सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे ही दर रविवारी बंद राहणार असून सकाळी ७ ते सांयकाळी ७ पर्यंत १२ तासासाठी धार्मिक स्थळे सुरु राहतील. कोरोनाचा वाढत प्रभाव व गर्दी रोखण्यासाठी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आता दररोज फक्त ५ हजार भाविकांना प्रवेश देण्यात येणार असून मंदिरात विनामास्क प्रवेश असणार नाही. केवळ ५ जणांना धार्मिक विधीसाठी उपस्थित राहता येणार आहे तर भाविकांनी शक्यतो ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले आहे.
उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने उद्यापासून जिल्हयातील चहाची दुकाने व पानटपरी बंद राहणार आहेत. उस्मानाबाद जिल्हयात शाळा कॉलेज खासगी कोचिंग क्लास बंद करण्यात आले असून खेळाची मैदाने, क्रीडांगणे, योगा क्लास, जिम, जलतरण तलाव बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक बगीचे सांयकाळी ७ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहतील इथे कोणी गर्दी कल्यास १ हजाराचा दंड आकारला जाणार आहे. मंगल कार्यलये, फंक्शन हॉल व लॉन्स बंद राहतील तर जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात सभा मेळावे संमेलने घेण्यास बंदी असून विवाह समारंभास ५० तर अंत्यविधीस २० जणांना उपस्थित राहता येणार आहे. हॉटेल रेस्टोरेंट उपहारगृह येथे सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत स्वयंपाक गृह चालू राहतील व इथे केवळ पार्सल सुविधा सुरु राहणार आहे. जिल्हयातील बारमध्येही आता यापुढे कोणाला बसता येणार नसून पार्सल सुविधा सुरु राहील.
उस्मानाबाद जिल्हयात रात्रींची संचारबंदी कायम असणार असून रात्री ७ ते पहाटे ५ या वेळेत कोणालाही बाहेर फिरत येणार नाही या काळात अत्यावश्यक सेवा व सुविधा मात्र सुरु राहतील. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या गेल्या ७२ तासात संपर्कात आलेल्या ८० टक्के व्यक्तींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे तर ज्या भागात कोरोना रुग्ण अधिक सापडत आहेत त्या भागात कंटेनमेंट झोन तयार करण्याचे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले आहेत. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वर्क फ्रॉम होम , मास्क , सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उस्मानाबाद जिल्हयातील कोरोना स्थिती
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून आजही कोरोना रुग्णांचा आकडा कायम राहिला, एकट्या उस्मानाबाद तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्यने शंभरी पार केली त्यात 74 जण उस्मानाबाद शहरातले आहेत हे विशेष त्यामुळे उस्मानाबाद शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालले आहे. आज रविवारी 184 नवीन रुग्ण सापडले असून त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 100 व उमरगा तालुक्यातील 23 रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 1 हजार 534 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. उस्मानाबाद शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 53 हजार 591 नमुने तपासले त्यापैकी 19 हजार 801 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याच दर 15.35 टक्के आहे. जिल्ह्यात 17 हजार 675 रुग्ण बरे झाले असून 89.26 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 592 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.99 टक्के मृत्यू दर आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यात आज 100 रुग्ण , तुळजापूर 10, उमरगा 23, लोहारा 15, कळंब 13, वाशी 09, भूम 02 व परंडा तालुक्यात 12 रुग्ण सापडले आहेत
18 मार्च – 164
19 मार्च – 119
20 मार्च – 125
21 मार्च – 118
22 मार्च – 173
23 मार्च – 130
24 मार्च – 176
25 मार्च – 174
26 मार्च – 155
27 मार्च – 224
28 मार्च – 184