उस्मानाबाद जिल्ह्यात ओमीक्रॉनचे आणखी 2 रुग्ण मोह्यात
ओमीक्रॉनच्या 5 रुग्णांपैकी 1 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथे ओमीक्रॉनचे आणखी 2 रुग्ण सापडल्याने धकधक वाढली असली तरी एक दिलासादायक बातमी आहे. ओमीक्रॉनच्या 5 रुग्णापैकी बावी येथील 1 जणांला 11 दिवसाच्या उपचारानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती चांगली आहे. मोहा येथील 31 वर्षीय पिता व त्यांच्या 2 वर्षीय मुलाचा ओमीक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 13 वर्षीय रुग्णाला डिस्चार्ज दिला आहे. मोहा येथील व्यक्ती घाना देशातुन आली होती त्यांना व त्यांच्या 2 वर्षीय मुलाला कोरोना झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 9 सक्रिय रुग्ण आहेत त्यापैकी 4 रुग्ण हे ओमीक्रॉन असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. गुरूवारी 1 हजार 556 नमुने तपासण्यात आले त्यात 2 नमुने पॉझिटिव्ह आल्याने हे प्रमाण 0.12 टक्के आहे. उस्मानाबाद शहरातील समता नगर येथील 32 वर्षीय पुरुष रुग्ण तर वाशी येथील 43 वर्षीय रुग्णाला कोरोना झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 65 हजार 652 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 96.91 टक्के आहे तर 67 हजार 739 पैकी 1 हजार 507 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे त्यामुळे मृत्यूचे प्रमाण हे 2.22 टक्के इतके आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 1507 मृत्यू तर 360 मृत्यू हे जिल्ह्याबाहेर उपचार घेत असताना झाले आहेत. 107 जणांचा मृत्यू हा दुर्धर आजार असल्याने झाला आहे तर पोस्ट कोविडमुळे 108 रुग्णांचा मृत्यू झाला. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.