कुभेंजा व मात्रेवाडीत रुग्ण वाढले – कोरोना पॉझिटिव्हीटी दर 5.72 टक्के
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी गेल्या 4 दिवसापासून धोक्याची घंटा असुन कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा शंभरी पार झाली आहे. आज कोरोनाचे 105 रुग्ण सापडले असून परंडा तालुक्यातील कुंभेज येथे एकाच वेळी 18 तर भूम तालुक्यातील मात्रेवाडीत 6 रुग्ण सापडले. उस्मानाबाद तालुक्यात 31 रुग्ण सापडले असून जिल्ह्यात 1 हजार 835 पैकी 105 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्हीटी दर हा 5.72 टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यात यापूर्वी 50 ते 60 च्या आसपास रुग्ण सापडत होते मात्र हा आकडा गेल्या 4 दिवसात 100 च्या जवळपास झाला असल्याने ही बाब चिंतेची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रुग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे. आजच्या 105 पैकी 14 रुग्ण हे 18 वर्ष वयोगटाखालील आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 105 रुग्ण सापडले असून त्यात 22 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीत तर 83 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीत पॉझिटिव्ह आले आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक 31 रुग्णांचा समावेश आहे तर तुळजापूर 7, उमरगा 3, लोहारा 5, कळंब 10, वाशी 10 , भूम 10 व परंडा तालुक्यातील 29 रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजाराबाबत कोणतीही प्राथमिक लक्षणे सापडल्यानंतर नागरिकांनी डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य तो वैद्यकीय उपचार घ्यावा तसेच लसीकरण करावे. कोरोना लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टनस ठेवणेसह इतर नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
मंगळवारी 74 रुग्ण उपचार नंतर बरे झाले असून 947 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 61 हजार 399 रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण 95.50 टक्के आहे तर 60 हजार 613 रुग्णांपैकी 1 हजार 420 रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला असून मृत्यू दर हा 2.34 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात उपचार घेत असताना 1 हजार 420 रुग्णांचा मृत्यू झाला तर 316 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यात उपचार घेत असताना व 100 जण पोस्ट कोविड गुंतागुंतमुळे मृत्यू झाला.
7 जुलै – 64 रुग्ण
8 जुलै – 62 रुग्ण
9 जुलै – 55 रुग्ण
10 जुलै – 58 रुग्ण
11 जुलै – 33 रुग्ण
12 जुलै – 67 रुग्ण
13 जुलै – 35 रुग्ण
14 जुलै – 61 रुग्ण
15 जुलै – 51 रुग्ण
16 जुलै – 54 रुग्ण
17 जुलै – 62 रुग्ण
18 जुलै – 57 रुग्ण
19 जुलै – 85 रुग्ण
20 जुलै – 45 रुग्ण
21 जुलै – 50 रुग्ण
22 जुलै – 60 रुग्ण
23 जुलै – 72 रुग्ण
24 जुलै – 69 रुग्ण
25 जुलै – 50 रुग्ण
26 जुलै- 83 रुग्ण
27 जुलै – 74 रुग्ण
28 जुलै – 102 रुग्ण
29 जुलै – 70 रुग्ण
30 जुलै – 72 रुग्ण
31 जुलै – 100 रुग्ण
1 ऑगस्ट – 83 रुग्ण
2 ऑगस्ट – 96 रुग्ण
3 ऑगस्ट – 105 रुग्ण