उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे 14 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून त्यातील तब्बल 12 रुग्ण हे उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा येथील आहेत तर 2 रुग्ण हे नळदुर्ग येथील आहेत . नळदुर्ग येथील रुग्ण पुणे येथून आले आहेत तर उस्मानाबाद शहरातील उस्मानपुरा येथील रुग्ण हे कोरोना रुग्णाच्या संपर्कातील असून या भागात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला सुरुवात झाली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे यांनी दिली. आज 54 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले त्यापैकी 34निगेटीव्ह आले तर 14 पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या 137 झाली असून त्यापैकी 76 जण बरे झाले आहेत तर 58 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 3 जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील 16 , लोहारा 7 व परांडा या तालुक्यात 11 रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात 35 रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका 3, वाशी तालुका 4 व उस्मानाबाद 55 , तुळजापूर येथे 6 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आजवर 2 हजार 62 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते मात्र त्यापैकी 1 हजार 797 स्वॅब निगेटीव्ह आले असून 135 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. उमरगा तालुक्यातील रुग्णालयात 14, लोहारा 1 , परंडा 13, उस्मानाबाद 21, कळंब 18 व तुळजापूर रुग्णालयात 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत