उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील विदारक सत्य समोर
कोरोनाग्रस्त रुग्णांना खुर्चीवर बसवुन ऑक्सिजनचा पुरवठा व उपचार
रुग्णालयात बेड मिळेना – खरी स्तिथी सांगणारे फोटो पहा
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या दररोजच्या आकड्याने 600 रुग्णांचा टप्पा पार केला असुन जिल्ह्यात 3 हजार 902 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या 15 दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन त्याचा ताण आरोग्य यंत्रणावर पडत आहे. मागील वर्षीच्या कोरोना लाटेपेक्षा यावर्षीच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडची गरज भासत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील बेड फुल्ल झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्ण भरती वाढत असल्याने ज्या रुग्णाची तब्येत स्थीर झाली आहे अशा काही रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये निगराणीखाली पाठवुन रिकाम्या झालेल्या बेडवर नवीन रुग्ण भरती करून सध्या जिल्हा रुग्णालयाची मदार अवलंबून आहे. जिल्हा रुग्णालयात शनिवारी काही काळ बेड उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेची मोठी धावपळ झाली तर रुग्णाची गैरसोय झाली.
जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ही स्तिथी सारखीच आहे. उस्मानाबाद तालुका व शहर कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याने शहरातील अनेक रुग्णालये फुल्ल झाली आहेत त्यामुळे अनेक रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. एकट्या उस्मानाबाद शहरात 300 पेक्षा जास्त रुग्ण रोज सापडत आहेत तर मृत्यूचा आकडाही वाढत आहे. सध्या कोरोनाचा पीक ( सर्वोच्च टोक ) असल्याने जिल्हा प्रशासनासमोरील अनेक आव्हाने आहे , उपलब्ध साधने व यंत्रणेच्या बळावर ते कोरोनाशी लढा देत आहेत मात्र त्यांना नागरिकांची साथ हवी आहे. आजही अनेक नागरिक विनामास्क विनाकारण फिरत असून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळणे व प्राथमिक लक्षणे दिसल्यावर ती अंगावर न काढता डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य वेळी उपचार घेणे गरजेचे आहे तरच कोरोना रुग्णाची वैद्यकीय स्तिथी बिकट होणार नाही पर्यायाने रुग्णांचा जीव वाचेल व सर्वांची धावपळ उडणार नाही. कोरोना संसर्ग रोखणे व तो आटोक्यात आणणे हे नागरिकांच्या हातात आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची व कुटूंबाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा ?
उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना झाल्यानंतर प्राथमिक लक्षणे नसलेल्या ( असीमटोमॅटिक ) रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा गृह विलगीकरनात ठेवले जाते त्यावेळी त्यांना तपासणी करून कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक शक्तिवर्धक व रोगप्रतिकारक औषधे दिली जातात मात्र त्यातील बरीच औषधे गोळ्या या शासकीय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत त्यात व्हिटॅमिन सी , झिंक , व्हिटॅमिन डी , पित्ताची पॅन डी यासह इतर टॉनिक व गोळ्याचा समावेश आहे त्यामुळे रुग्णांना त्या मेडिकलमधून खरेदी कराव्या लागतात. शासकीय रुग्णालयातून लक्षणे नसलेल्या रुग्णांना केवळ कॅल्शियम व पॅरासीटेमॉल दिले जात असल्याचे दिसते. कुटुंबातील अनेक सदस्य कोरोना बाधित येत असल्याने गोरगरीब रुग्णांना हा आर्थिक खर्च परवडणारा नाही त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन आवश्यक साठा उपलब्ध करून तो किमान गरजू रुग्णांना तरी वितरीत करून द्यावा अशी मागणी होत आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवलेली असताना व त्यानुसार औषधी सामुग्री व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे लेखी आदेश असतानाही अनेकांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्याने नियोजन कोलमडले आहे.
विडिओ साठी
सर मान्य आहे Corona आहे परंतु पेशंट सोबत जे माणसे आहेत त्यांना मध्ये जायला परवानगी कोणी दिली. ते पन पीपी किट न घालता. त्यांना corona होत नाही का???
Barobar ahe