उस्मानाबादचा पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक तरीही सरकारचे दुर्लक्ष
गेल्या आठवड्यात ३९.८२ टक्के रुग्ण : मृत्यु दरही चिंताजनक , सारीचे संकट
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हयात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून १० एप्रिल ते १६ एप्रिल या सात दिवसांचा रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी रेट जाहीर झाला असून उस्मानाबादचा राज्यात सर्वात दर जास्त असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात ११ हजार २४६ रुग्णाचे नमुने तपासण्यात आले त्यापैकी ४ हजार ४७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून हा दर ३९.८२ टक्के आहे. उस्मानाबादचा दर राज्यात सर्वाधिक असतानाही इथे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असून रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध नाही तर कोरोनाची कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लस संपल्याने लसीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे तर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड फुल्ल असून रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. दररोज जवळपास २० रुग्णाचा मृत्यू होत असून हि बाब चिंताजनक असतानाही उस्मानाबाद जिल्ह्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार , चार पैकी 3 आमदार सत्ताधारी शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत तरी देखील जिल्ह्याला पर्याप्त वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत हे दुर्दैव आहे तर पालकमंत्री शंकरराव गडाख हे शिवसेनेचे आहेत, इतकी मोठी फौज असतानाही जिल्ह्याला काहीही मिळत नसल्याने जनतेत नाराजीचा सूर आहे. सोशल मीडियावर शिवसेनेसह सरकारच्या भूमिकेवर टीका होत आहे.
उस्मानाबाद पाठोपाठ हिंगोली जिल्ह्याचा नंबर असून तो ३९. २९ टक्के आहे. परभणी ३६.८५ टक्के, नागपूर जिल्हा ३५.३२ टक्के आहे तर मराठवाड्यातील औरंगाबाद २४.६८ , लातूर २८.२५, नांदेड २८. ३० , जालना २२.९७ , बीड जिल्ह्याचा दर २३. ३८ टक्के आहे तर सर्वाधिक कमी दर हा जळगाव जिल्ह्याचा ७.६२ टक्के आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना स्तिथी –
उस्मानाबाद जिल्ह्यात आजवर 1 लाख 86 हजार 698 नमुने तपासले त्यापैकी 29 हजार 077 रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर 22.15 टक्के आहे. जिल्ह्यात 22 हजार 607 रुग्ण बरे झाले असून 79.12 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर 711 रुग्णांचा मृत्यू झाला असून 2.37 टक्के मृत्यू दर आहे
कोरोनाचा वाढता आलेख पहा
दिनांक – रुग्ण – मृत्यू – उस्मानाबाद तालुका
1 मार्च – 09 रुग्ण – 00 मृत्यू
2 मार्च – 40 रुग्ण – 01 मृत्यू
3 मार्च – 16 रुग्ण – 00 मृत्यू
4 मार्च – 45 रुग्ण – 02 मृत्यू
5 मार्च – 26 रुग्ण – 00 मृत्यू
6 मार्च – 30 रुग्ण – 00 मृत्यू
7 मार्च – 49 रुग्ण – 00 मृत्यू
8 मार्च – 16 रुग्ण – 01 मृत्यू
9 मार्च – 38 रुग्ण – 01 मृत्यू
10 मार्च – 24 रुग्ण – 00 मृत्यू
11 मार्च – 58 रुग्ण – 00 मृत्यू
12 मार्च – 27 रुग्ण – 01 मृत्यू
13 मार्च – 54 रुग्ण – 00 मृत्यू
14 मार्च – 69 रुग्ण – 00 मृत्यू
15 मार्च – 52 रुग्ण – 00 मृत्यू
16 मार्च – 123 रुग्ण – 01 मृत्यू
17 मार्च – 94 रुग्ण – 00 मृत्यू
18 मार्च – 164 रुग्ण – 00 मृत्यू
19 मार्च – 119 रुग्ण – 00 मृत्यू
20 मार्च – 125 रुग्ण – 00 मृत्यू
21 मार्च – 118 रुग्ण – 01 मृत्यू
22 मार्च – 173 रुग्ण – 00 मृत्यू
23 मार्च – 130 रुग्ण – 00 मृत्यू
24 मार्च – 176 रुग्ण – 00 मृत्यू
25 मार्च – 174 रुग्ण – 00 मृत्यू
26 मार्च – 155 रुग्ण – 02 मृत्यू
27 मार्च – 224 रुग्ण – 00 मृत्यू
28 मार्च – 184 रुग्ण – 00 मृत्यू
29 मार्च – 239 रुग्ण – 00 मृत्यू
30 मार्च – 242 रुग्ण – 00 मृत्यू
31 मार्च – 253 रुग्ण – 02 मृत्यू
01 एप्रिल – 283 रुग्ण – 04 मृत्यू
02 एप्रिल – 292 रुग्ण – 00 मृत्यू
03 एप्रिल – 343 रुग्ण – 02 मृत्यू
04 एप्रिल – 252 रुग्ण – 00 मृत्यू
05 एप्रिल – 423 रुग्ण – 02 मृत्यू
06 एप्रिल – 415 रुग्ण – 08 मृत्यू
07 एप्रिल – 468 रुग्ण – 05 मृत्यू
08 एप्रिल – 489 रुग्ण – 02 मृत्यू
09 एप्रिल – 564 रुग्ण – 00 मृत्यू
10 एप्रिल – 558 रुग्ण – 07 मृत्यू
11 एप्रिल – 573 रुग्ण – 03 मृत्यू
12 एप्रिल – 680 रुग्ण – 05 मृत्यू
13 एप्रिल – 590 रुग्ण – 07 मृत्यू
14 एप्रिल – 613 रुग्ण – 15 मृत्यू
15 एप्रिल – 764 रुग्ण – 10 मृत्यू
16 एप्रिल – 580 रुग्ण – 23 मृत्यू
17 एप्रिल – 653 रुग्ण – 20 मृत्यू
STAY home STAY SAFE