उद्यापासून शाळा बंद राहणार – उस्मानाबाद शिक्षण विभागाची माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
सोमवारपासून 15 फेब्रुवारी पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली ते नववी आणी अकरावी च्या शाळा बंद राहतील तर 10 वी व 12 वीचे वर्ग हे नियमितपणे सुरु राहतील. राज्य सरकारने कोरोना निर्बंध अनुषंगाने काढलेल्या आदेशानंतर उस्मानाबाद जिल्ह्याधिकारी कौस्तुभ दिवेगावकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी याबाबत शाळा बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी गजानन सुसर यांनी दैनिक समय सारथी शी बोलताना दिली.
राज्य सरकारच्या सूचना होत्या मात्र जिल्हाधिकारी किंवा शिक्षण विभाग स्तरावर कोणतेही शाळा बंदचे आदेश न आल्याने अनेक शाळांनी त्यांच्या विद्यार्थी यांना शाळा नियमितपणे सुरु राहतील असे sms केले होते त्यामुळे एक मोठा संभ्रम उडाला होता मात्र त्यावर आता शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिल्याने पडदा पडला आहे.
आता जर शाळा बंद केल्या तर पुढल्या वर्षी पासून लेकर मोबाईल च्या वेडामुळे . वेडेच्या इस्पितळात दाखल करावी लागतील .
Ok
Please close 10th class ?
10and 12class नियम पाळून चालू ठेवा