ईदमुळे जीवनावश्यक दुकानांना सूट – सकाळी 7 ते 11 दुकाने सुरू राहणार – जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 8 मे ते 13 मे दरम्यान जनता कर्फ्यु लावला होता या काळात केलेत अत्यावश्यक सेवा सुरू होत्या मात्र ईद असल्याने 12 मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील तर सर्व पेट्रोल पपं हे 7 ते 11 वेळेत सूरु राहतील तर सर्व बँका या सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सुरू राहणार आहेत असे जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केले आहे त्यामुळे किराणा, बेकरी , भाजी पाला ,फळ दुकाने सुरू होणार आहेत