‘इथे’ धोका आहे – सावधान, सोशल मीडियाद्वारे अनोळखी महिलांशी संपर्क टाळा
फसवणुकीची शक्यता, तक्रार द्या – पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आवाहन
नाशिक – समय सारथी
सोशल मीडियाद्वारे अनोळखी महिलांशी चॅटींग व व्हिडिओ कॉल टाळा किंवा संपर्क टाळा तुमची कदाचीत फसवणुक होऊ शकते त्यामुळे सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करण्याचे आवाहन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. नाशिक पोलिसांनी याबाबत जनजागृती करण्यासाठी एक मोहीम हाती घेतली असून याद्वारे लोकांनी काळजी व फसवणूक झाली असेल तर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. फसवणुक झालेल्या व्यक्तीची ओळख व नाव गोपनीय ठेवले जाईल त्यामुळे न घाबरता तक्रार केल्यास यामागे असलेले मोठे रॅकेट उघड होऊन इतर लोकांची फसवणुक टाळता येऊ शकते.
सोशल मीडियाचे प्रत्येक अँप अभ्यासून वापरणे व सतर्क राहणे गरजेचे आहे. व्हाट्सअप , फेसबुक, इन्स्टाग्राम, डेटिंग अँप इ माध्यमातुन महिलांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून पुरुषांशी मैत्री झाल्यावर अश्लील चाळे करण्यास भाग पाडून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात येतो व शेवटी अकाउंट हॅक करून धमकीद्वारे पैशाची मागणी केली जाते.शारीरिक लोभाचे अमिश दाखवून अनोळखी महिलेशी बोलताना कमालीची सतर्कता ठेवा, बहुतांश वेळा महिलेच्या नावाने पुरुष अकाउंट वापरतात व फसवणुकीच्या जाळ्यात अडकवतात त्यामुळे असा प्रकार घडला असेल तर निःसंकोचपणे जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. नाशिक पोलिसांनी यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासह हनी ट्रॅपची प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असुन पिडीत व्यक्तींनी समोर यावे.