आशेचा किरण – ओबीसी आरक्षण अहवाल सादर, 12 जुलैला सुनावणी
उस्मानाबाद – समय सारथी
राज्य मागासवर्ग आयोगाकडून ओबीसी इम्प्रिकिल डेटा मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव याना सादर करण्यात आले आहे त्यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.
बंद लिफाफ्यातील अहवाल सादर केला असून 12 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.मध्यप्रदेश धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून अहवाल सादर केल्याची माहिती आहे.
राज्यात सध्या महानगरपालिका नगर परिषद निवडणुकीची घोषणा झाली असून अद्याप निवडणुका न झाल्याने त्या दरम्यान काही घोषणा निर्णय झाल्यास अजूनही एक आशेचा किरण आहे. महानगर पालिका व नगर पालिका निवडणुका आरक्षण सोडत ही ओबीसी वागळता काढण्यात आली आहे तर जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत ही 13 जुलै रोजी होणार आहे.