उस्मानाबाद – समय सारथी
तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार,शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे आज पहाटे साडेतीन वाजता अल्पशा आजाराने सोलापूरच्या अश्विनी रूग्णालयात निधन झाले.अंत्यविधी आज दुपारी तीन नंतर अणदुर येथे होईल. त्यांच्या निधनाने राजकीय, शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे. अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणीचे गुरुजी हे तालुक्याचा राजकारणातील कोहिनुर हिरा होते.
सिद्रामप्पा आलुरे हे 1980 मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा 14 हजार 579 मतांनी पराभव करून विजय मिळविला होता.1980 च्या निवडणुकीत त्यावेळी आलुरे याना 34 हजार 121 तर खपले यांना 19 हजार 542 मते पडली होती . 1985 ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते त्यांनी आलुरे यांचा 11 हजार 230 मतांनी पराभव केला. 1985 साली शेकापचे खपले यांना 42 हजार 553 तर काँग्रेस आयचे आलुरे यांना 31 हजार 323 मते मिळाली होती.