आरक्षित जमीन घोटाळा – नगराध्यक्ष यांच्या पुत्राला अटक , पदाचा दुरुपयोग
परंडा नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना अभय ? मुख्य सूत्रधार कधी होणार गजाआड ?
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील परंडा शहरातील जमीन सर्वे नं.२३४/ब यांचे खरेदी खत करून नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी आपल्या पदाचा गैरवापर व दुरुपयोग करून स्वतः च्या मुलाचे यांचे आरक्षित जमिनीचे बेकायदेशीररित्या नावे केल्याप्रकरणी त्यांचे पुत्र वसीम जाकीर सौदागर यांच्या विरोधात भा.द.वि. कलम ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा पोलिसांनी आरोपी वसीम सौदागर यांस अटक केली आहे.
नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी नगराध्यक्ष पदाचा दुरुपयोग करून परंडा शहर हद्दीतील सर्वे नं.२३४ /ब ही शासकीय आरक्षीत नगरपालिकेचे कर्मचारी यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या खरेदीखत केलेबाबत जिल्हाधिकारी व मंत्रालय यांच्याकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी १६ ऑगस्ट २०२० रोजी दिलेल्या निर्णयात नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वतः च्या मुलाचे नाव म्हणजेच रक्ताच्या नावातील व्यक्तीचे नावे खरेदीखत करून पदाचा दुरुपयोग केला आहे.याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यधिकारी यांना दिले होते. यातून ४ सप्टेंबर २०२० रोजी मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेचे लिपिक महेश रतन कसबे व बादेश इब्राहिम मुजावर या दोन कर्मचाऱ्याविरोधात परंडा पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, मंत्रालय व औरंगाबाद खंडपीठात देखील सुरू असून तक्रारी होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर आरोपी वसीम जाकीर सौदागर यांस पोलिसांनी अटक केली असल्याने आता या प्रकरणातील मुख्य आरोपीला ही अटक करणार का याकडे लक्ष लागले आहे ?
1 No