आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर होणारे हल्ले थांबवा अन्यथा जसाच तसे उत्तर मिळेल
परंडा , समय सारथी
आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर होणारे हल्ले थांबवा अन्यथा जसाच तसे उत्तर मिळेल असा इशारा त्यांच्या समर्थकांनी दिला आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात आज भूम नंतर परंडा येथे शक्तिप्रदर्शन करीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तानाजी सावंत यांच्या कार्यालयवर होणारे हल्ले रोखले नाही तर हल्लेखोर शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. परंडा येथे शक्तिप्रदर्शन करीत सावंत समर्थकांकडून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करुन जोरदार शक्तिप्रदर्शन केले.आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ सोमवारी येथील शिवाजी चौकात मोठी गर्दी करत घोषणाबाजी केली. समर्थकांच्या हातात बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे, डॉ तानाजीराव सावंत यांच्या पोस्टर्ससह शिवसेना नावाचा उल्लेख असलेले आणि धनुष्यबाणाची निशाणी असलेले झेंडे देखील होते.
तहसील कार्यालयाच्या परिसरात सावंत समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती. तहसील कार्यालय परिसरातून सावंत समर्थकांनी आपली एकजूटता दाखवत छत्रपती शिवाजी चौकापर्यंत मोर्चा काढला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी कृषी-पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंके,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, युवासेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके आदींनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयवर होणारे हल्ले रोखले नाही तर हल्लेखोर शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, नगरसेवक पापा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष शाम मोरे, माजी शिवसेना उपशहरप्रमुख दत्ता रणभोर, भूम माजीउपसभापती बालाजी गुंजाळ, सतिश दैन, पोपट चोबे, तालुका उपप्रमुख शुक्राचार्य ढोरे, पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, विकास देवकते, तानाजी कोलते, पिन्दू सागडे, आशोक गरड, विजय नवले, सतिष मेहेर, सुभाष जाधव, बापुसाहेब देशमुख, अनिल देशमुख, आप्पाणाहेब बकाल, विरेंद्र पाटील, जयदेव गोफणे, अमर गाडे, औदुंबर गाडे, प्रकाश बारसकर, बापु गुंजाळ, विक्रंम देशमुख यांच्यासह शेकडो पक्षाधिकारी उपस्थित होते. सावंत समर्थकांनी इशारा दिल्याने तालुक्यातील राजकारण तापले आहे. आगामी काळात शिवसेना व तानाजी सावंत समर्थक यांच्यामध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची स्तिथी आहे.