आदेश प्राप्त,मुख्याधिकारी यांना नोटीसा – गुन्हा नोंद कधी होणार ?
या 69 जणांसोबत पोट करारनामा – तुळजापूर शहर प्रवेश कर घोटाळा
उस्मानाबाद – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथील शहर प्रवेश कर घोटाळ्यात गुन्हा नोंद करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पत्र तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना प्राप्त झाले असून लवकरच यावर कारवाई करून गुन्हा नोंदवीला जाणार आहे. शहर प्रवेश कर घोटाळ्यात ठेकेदार सीताराम छत्रे यांना जवळपास 50 लाख रुपयांचा दंड आकारला असून तो अद्याप वसुलपात्र असल्याची माहिती आहे. पोटकरारात समाविष्ट 69 जणांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणात यापूर्वी गुन्हे नोंद करण्यास टाळाटाळ व विलंब करणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत.
तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने 2015 ते 2018 या काळाकरिता 2 कोटी 40 लाख रुपये रकमेत वाहनतळ लिलाव देण्यात आला होता यात प्रतिवर्ष 10 टक्के भाडेवाढ होती.तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्या चौकशी आदेशानुसार सर्वप्रथम चौकशीत या प्रवेश कर घोटाळ्याचा उलघडा झाला होता, त्यानंतर जिल्हाधिकारी गमे यांनी 12 जुलै 2018 रोजी नगर परिषद मुख्याधिकारी व पोलीस अधीक्षक यांना 10 ऑगस्ट 2018 रोजी पत्र लिहून गुन्हा नोंद करण्यास सांगितले. 7 ऑक्टोंबर 2018 रोजी जिल्हाधिकारी गमे यांनी मुख्याधिकारी आशिष लोकरे यांना कार्यवाही अहवाल सादर करण्यास कळविले मात्र तक्रार देताना मूळ कागदपत्र व पुरावे न दिल्याने पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास अडचणी असल्याचे कळविले तेव्हांपासून तुळजापूर पोलीस व नगर परिषद यांच्यात पत्रव्यवहाराचा खेळ 3 वर्षांपासून सुरु आहे. या प्रकरणात फौजदारी गुन्हा नोंद कणाऱ्यास विलंब करणाऱ्या तत्कालीन नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत त्यानुसार आदेशाची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले असल्याने आता तरी यात गुन्हा नोंद होणार का ? हा प्रश्न समोर येत आहे. ठेकेदार राम छत्रे यांना व्यक्तिगत वाहन तळ पर्किंग ठेका दिला होता मात्र छत्रे यांनी इतर जणांसोबत पोट करार केला आहे.समाजसेवक तथा तक्रारदार राजाभाऊ माने यांनी 69 जणांचे पार्टनरशिप डीड व इतर कागदपत्रे नगर परिषदेला पुराव्यासह दिले आहेत.
वाहनतळमध्ये उभे राहिलेल्या वाहनकडून कर आकारण्यात येणार होता मात्र तुळजापुर शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडून सक्तीने प्रवेश कर नावाखाली कर वसुल केला जात होता. या प्रकरणात मूळ अभिलेखे उपलब्ध झाले नाहीत किंवा गहाळ झाले असतील तर नगर परिषद मुख्याधिकारी यांनी महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेखे अधिनियम 2005 मधील तरतूदी प्रमाणे तात्काळ संबंधीतावर कारवाई करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा असे आदेशीत केले आहे.
छत्रे यांनी 69 जणांसोबत करारनामा केला आहे त्यात अभिजित कुतवळ, महेश कांबळे,प्रवीण कदम,सुदर्शन वाघमारे,गुलचंद व्यवहारे,विकास मलबा,सचिन वसंत अमृतराव, नरसिंग बोधले,आनंद क्षीरसागर,सागर कदम,श्रीनाथ शिंदे,नंदकुमार लांडे,सुशांत कुलकर्णी,अजिंक्य सरडे,हनुमंत शेळके,आनंद जगताप,गोकुळ मगर,गणेश इंगळे,रणजित इंगळे,इंद्रजीत लोंढे,संभाजी भांजी,नवनाथ पांढरे, विशाल भांजी,गणेश अणदूरकर,संदीप शेटे,सचिन कदम, लक्ष्मीकांत कदम,दत्तात्रय धुमाळ, श्रीकांत रसाळ,खंडू टोले,विलास इंगळे,गोविंद गुरव,अंकुश पांढरे,सुशील छत्रे,सतीश छत्रे,रमेश वाघमारे,चंद्रशेखर भोसले,दादा पवेकर,निलेश टोले,बालाजी टोले,सुनील साळुंके,नानासाहेब टोले,धीरज प्रकाश पाटील,प्रकाश सोंजी, गणेश भिंगारे,अंबादास धनगडे, रोहिदास कांबळे,उमेश क्षीरसागर,आनंद हंगरगेकर,विजय विलास गंगणे,सुनील मसके, प्रशांत हंगरगेकर,उदय शेटे,प्रशांत डाके,धनंजय करडे,नेताजी साठे,विजय काकडे,अतुल मसके,बालाजी गंगणे,चंद्रकांत गंगणे,सतीश राऊत,कैलास साठे,आकाश माने,बजरंग देवडे,नागनाथ नरवडे, कल्याण कचरे,करीम मुर्शाद व देवप्पा मसके यांचा समावेश आहे.