आता फक्त रविवारी जनता कर्फ्यु , बाकी नियम जैसे थे – उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाल्याने आता केवळ रविवारी जनता कर्फ्यु असणार आहे , याबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश काढले असून ते 15 जून पर्यंत सकाळी 7 पर्यंत लागू असतील.
या काळात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक दुकाने वगळता सर्व दुकाने आस्थापना बंद असणार आहे.
अगोदर दर शनिवारी व रविवार जनता कर्फ्यु होता मात्र तो आता एक दिवस कमी करून फक्त रविवारी असणार आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने, लसीकरण, औषधी दुकाने, टॅक्सी ऑटोरिक्षा व सार्वजनिक बसेस वाहतूक, मालवाहतूक, पाणी पुरवठा सेवा, एटीएम,विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा या सुविधा, भाजीपाला , फळ विक्री , किराणा दुकान , बेकरी सुरू राहतील.