आठवडी बाजारात अतिक्रमनाचा विळखा – तक्रार दाखल, कारवाई होणार का ?
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील आठवडी बाजारात काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याची तक्रार योगेश अतकरे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे म्हणटले आहे की, आठवडी बाजारात रज्जाक पाशा तांबोळी व फिरोज गणी सय्यद या दोन व्यक्तींनी रातोरात पत्र्याचे मोठे शेड उभे करुन त्या ठिकाणी अवैध व्यवसाय चालु केले आहेत. याबाबत नगर परिषदेकडे अनेक वेळा तक्रार देऊनही कारवाई केली नाही. जुने मटण मार्केट व इतर ठिकाणी अतिक्रमण केले आहे. नगर परिषदेतील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे या अतिक्रमण व व्यवसायाला पाठबळ असल्याचा आरोप केला आहे. तरी कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणात अभय कोणाचे ? कारवाई होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.