आठवडी बाजारचे स्थळ बदलले – धाराशिव नगर परिषदेचा महत्वाचा निर्णय
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेने आठवडी बाजार संबंधित महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज 30 एप्रिल रोजी होणारा आठवडी बाजार धारासूर मर्दिनी मंदिर परिसरात होणार आहे. नगर परिषद धाराशिव तर्फे व्यापारी व जनतेस भोंगा लावून सूचना केल्या आहेत. नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांनी ही माहिती दिली आहे.