तुळजापुर – कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदीमाया आदीशक्ती असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकभंरी नवराञ महोत्सवास दुर्गाष्टमी दिनी दि.२१ गुरुवार रोजी”आई राजा उदो उदो” च्या गजरात दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला सात दिवसापासुन श्री तुळजा भवानी मातेची मंचकी निद्रा असलेली मुख्य चल मुर्ती गुरुवारी पहाटे मुख्य सिंहासनावर विराजमान करण्यात आली या नंतर श्री देवीजीस पंचामृत अभिषेक पुजा करवुन नित्योपचार वस्ञो अलंकार पुजा करण्यात आली.या वेळी श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा महंत हमरोजी बुवा मुख्य भोपे पुजारी पाळीकर पुजारी उपाध्ये पुजारी सेवेदार पुजारी श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर संस्थानचे तहसीलदार सौदागर तांदळे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेवर इंतुले आदीसह मंदीर कर्मचारी उपस्थित होते.यानंतर पुन्हा सकाळी ६ वाजता श्री देवीजीस पंचामृत अभिषेक घालुन वस्ञोअलंकार घालुन दुपारती करण्यात आली. यानंतर मंदीरातील श्री गणेश ओवरीत पारंपारिक पद्धतीने शाकभंरी देवीजीची प्रतिमा ठेवुन शाकभंरी नवराञ महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभ करण्यात आला
.या वेळी तहसीलदार सौदागर तांदळे धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत तुकोजी बुवा ,वाकोजी बुवा शाकभंरी नवराञ महोत्सवाचे मुख्य यजमान भोपे पुजारी बळंवत बुबासाहेब कदम पाळीचे मुख्य भोपे पुजारी यशराज मुकुंद कदम श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी अमर परमेश्वर पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे पुजारी मंडळाचे संचालक अविनाश गंगणे सुधीर रोचकरी, श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, विश्वास कदम परमेश्वर जयसिंग पाटील राजकुमार भोसले आदीसह मंदीर कर्मचारी भोपे पुजारी पाळीकर पुजारी उपाध्ये पुजारी सेवेदार पुजारी उपस्थित होते. * शाकभंरी नवराञ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे राजंनगाव येथील श्री देवी भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील यांनी श्री देवीच्या गाभाऱ्यासह संपुर्ण मंदीर परिसरात आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली* होती.सायंकाळी प्रक्षाळ पुजा होऊन मंदीर परिसरात छबिना काढण्यात आला.