अवैध धंद्यावर छापा – बीड पोलिसांचे विशेष पथक उस्मानाबाद शहरात
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद शहरातील अवैध धंद्यावर पोलिसांच्या धाडी पडल्या असून पोलिसांची कारवाई सुरु आहे. अवैध लॉटरी, चक्री, जुगार व मटका बुकी अड्यावर विशेष पथकाची उस्मानाबाद शहरात धाड पडली आहे. बीड पोलीस दलाचे विशेष पथकाची उस्मानाबाद शहरात अनेक ठिकाणी कारवाई सुरु आहे. या कारवाईत लाखो रुपये, कॅम्पुटर व एजन्ट यांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. उस्मानाबाद शहर व आनंद नगर पोलीस ठाण्यात जवळपास 40 ते 50 जणांना ताब्यात घेतले असून पोलीस चौकशी व कारवाई सुरु आहे.
बीड येथील सहायक पोलीस उपाधीक्षक आयपीएस दर्जाचे अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वात बीड पोलिसांचे 25 जणांचे विशेष पथक करून झाले असून कारवाई सुरु आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक के एम् मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या आदेशाने विशेष पथकाची कारवाईला सुरुवात झाली असून यामुळे अवैध धंदे करणाऱ्या माफियाचे धाबे दनाणले आहे. उस्मानाबाद शहरात अवैध धंदे वाढल्याने व पोलिसांचे नियंत्रण नसल्याने बीड पोलिसांनी उस्मानाबाद येथे येऊन कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कुमावत यांच्या सारखे दबंग अधिकारी कारवाईसाठी आल्याने ठोस कारवाईची शक्यता आहे.