अल्पवयीन मुलीवर अत्याचार – आरोपीस 20 वर्ष कारावासाची उस्मानाबाद कोर्टाची शिक्षा
उस्मानाबाद – समय सारथी
एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व मारहाण केल्या प्रकरणी एका आरोपीस उस्मानाबाद येथील कोर्टाने 20 वर्ष कारावासाची व 7 हजार दंडाची शिक्षा ठोठवली आहे. तुळजापूर तालुक्यातील 2018 सालची ही अत्याचाराची दुर्दैवी घटना असून आरोपी विलास कोंडीबा गलांडे ( पुळकोटी ता माण जिल्हा सातारा ) याला कोर्टाने दोषी ठरवीत शिक्षा सुनावली आहे.
तुळजापूर तालुक्यातील एक 13 वर्षाची मुलगी 25 जुन 2018 रोजी सायंकाळी 5 लागली राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शेतात नैसर्गिक विधीसाठी गेली असता तिला पाहून आरोपी हा तिच्या मागे गेला व उसाच्या शेतात नेहून बलात्कार केला व मारहाण करून पळ काढला. आरोपी हा पिक अप ड्रायव्हर असून त्याने मुलीला पाहून वाहन थांबविले व तिच्या मागे जाऊन हे कृत्य केले. उस्मानाबाद येथील विशेष न्यायाधीश पोस्को कोर्टचे सचिन जगताप यांनी ही शिक्षा ठोठवली आहे.
घटनास्थळी बलात्कार करून आरोपी ड्रायवरने पळ काढला मात्र त्याला लोकांनी पळ काढताना पाहिले. साक्षीदार प्रत्यक्ष साक्षीदार यांच्या माहिती वरून तुळजापूर शहरात आलेल्या व गेलेल्या वाहनाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व दिलेल्या वर्णनानुसार गाडीचा शोध घेऊन आरोपीला सोलापूर येथून अटक केले. तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आरोपपत्र दाखल केले, पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक वनिता वाघमारे यांनी काम पाहिले.
या प्रकरणात 16 साक्षीदार कोर्टात तपासले गेले यात घटना व घटनेनंतर साक्षीदार, मोबाईल लोकेशन महत्वाचे पुरावे ठरले तर आरोपीला मुलीने अटक केल्यानंतर ओळखले.कलम 376(3) व बाल लैंगिक अत्याचार कलम 4 नुसार दोषी ठरवत 20 वर्षाची शिक्षा दिली. विशेष शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी या प्रकरणात कोर्टात बाजू मांडली. यावेळी सर्वोच्छ न्यायालयाचे निवाडे महत्वपूर्ण ठरले.