धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळवण्यासाठी सत्तेची समीकरणे मांडायला सुरुवात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी राष्ट्रवादी महायुती सोबत असल्याचे जाहीर केले. निवडणुक पुर्व महायुती होती व नंतर सुद्धा ती असणार आहे, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली असुन आम्ही कोणत्याही अमिषाला बळी पडणार नसुन त्याला थारा देणार नाही असा व्हिडीओ त्यांनी जारी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या असुन सत्तेच्या समीकरणात त्यांची भुमिका महत्वाची आहे. राष्ट्रवादीला भाजप शिवसेना महायुतीसह इतर आघाडीचे निमंत्रण असुन तशी चाचपणी केली जात आहे, त्या पार्शवभुमीवर धुरगुडे यांनी भुमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीला अध्यक्ष पदासह अन्य वाटा देण्याची तयारी काही जणांनी दर्शवली आहे त्यामुळे चलबिचल व संभ्रम नको म्हणुन त्यांचा व्हिडिओ दिला आहे. राष्ट्रवादीचे सदस्य सद्या भाजप सोबत असुन ते सहलीवर आहेत.
धाराशिव जिल्ह्यात पाटील परिवार म्हणजे पर्यायाने भाजपला एकटे पाडण्याचा डाव सध्या रचला जात असुन त्या दृष्टीने चाचपणी सुरु आहे मात्र डॉ पाटील व पवार यांचे कौटुंबिक नातेवाईक असल्याने ते तूर्तास शक्य वाटत नाही असे राजकीय जाणकार यांचे मत आहे.











