अभिषेक पुजा सुरु करण्याचा निर्णय – तब्बल 2 वर्षानंतर विधी सुरु होणार , तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या बैठकीत निर्णय
तुळजापूर – समय सारथी , कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजा सुरु करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, कोरोना निर्बंध लागू केल्यानंतर मागील दोन वर्षांपासून तुळजाभवानी देवीचे अभिषेक पुजा बंद होत्या मात्र आता तब्बल 2 वर्षानंतर या पुजा सुरु होणार आहेत. भाविक पुजारी यांची अभिषेक पुजा सुरु करण्याची मागणी होती याला तुळजाभवानी मंदिर संस्थानने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, या निर्णयामुळे देवी भक्तात आनंदाचे वातावरण आहे. दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा होणार आहेत. तुळजाभवानी देवीला सकाळी व सायंकाळी रोज अभिषेक पूजा असत मात्र आता केवळ सकाळी अभिषेक पूजा सुरु होणार आहे, सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
अभिषेक पुजा सुरु होणार असल्याने भक्तांना देवीचा नवस व कुलाचार पुजा करता येणार आहेत.देवीला दूध दही व केळी याचा अभिषेक भक्त घालतात.