अक्षय मेटल उद्योग समूहास विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भेट – उद्योग व कामगार कायद्याची घेतली माहिती
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद औद्योगिक क्षेत्र येथील अक्षय मेटल या उद्योग समूहास विधी महाविद्यालयातील विद्यार्थांनी भेट देत उद्योग कायदे, कामगार कायदे व त्यांचे हक्क, मिळणाऱ्या सुविधा यांची माहिती घेतली. अक्षय मेटलचे मालक संतोष शेटे यांनी उद्योगासह कामगार यांना देण्यात आलेल्या सुविधा, कामगारांची घेतली जाणारी काळजी व उपाययोजना यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना उद्योग व कामगार कायदे, त्यांचे हक्क, मालकांची जबाबदारी याची प्रत्यक्ष माहिती व्हावी यासाठी हे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही जी शिंदे, प्रा डॉ स्मिता कोल्हे, डॉ. संजय आंबेकर, प्रा चांदणी घोगरे, प्रा डॉ पौर्णिमा डागडिया, प्रा दीपाली बारकूल यांच्यासह विद्यार्थीनी सहभाग नोंदविला.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित डॉ बापूजी साळुंके विधी महाविद्यालय यांच्या वतीने विद्यार्थी यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात त्याचा अभ्यास भेट हा एक भाग आहे. कायदे विषयक जनजागृती शिबीर, तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानमाला व चर्चा सत्र, करिअर विषयक मार्गदर्शन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.