उस्मानाबाद समय सारथी
जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १ रुग्ण सापडला असून रुग्णाची संख्या १२३ झाली असून त्यापैकी ५८ जण बरे झाले असून ६३ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर ३ जणांचा कोरोना उपचार सुरू असताना मृत्यू झाले आहेत.
आज रोजी उस्मानाबाद येथून 64 सॅम्पल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
त्यापैकी 1 पॉझिटिव्ह,1 प्रलंबित व 62 निगेटिव आले आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी या गावातील हा रुग्ण आहे.सदरील रुग्ण हा नवी मुंबई रिटर्न असून सहा दिवसापूर्वी आलेला आहे त्याला गावात क्वारानटाइन केले होते.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाच्या स्थानिक संसर्गाला सुरुवात झाली असून दररोज रुग्ण संख्या वाढत आहे. जिल्ह्यात आजही पुणे मुंबई रिटर्नचा धोका कायम आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील १६ , लोहारा ७ व परांडा या तालुक्यात ११ रुग्ण सापडले असून कळंब तालुक्यात ३५ रुग्ण सापडले आहेत तर भूम तालुका ३, वाशी तालुका ४ व उस्मानाबाद ४३, तुळजापूर येथे ४ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.