शेतकर्यांना मिळणार दिलासा – 5 वर्षाचे 55 कोटींचे वीज बिल भैरवनाथ कारखाना भरणार
धाराशिव / परंडा – समय सारथी
मराठवाड्याच्या हक्काच्या कृष्णा खोर्यातील 7 टीएमसी पाण्याची कामे अंतीम टप्प्यात आली असुन जेऊर बोगद्यासह अन्य ठिकाणची 90 टक्के कामे झाली आहेत, उर्वरीत कामे आगामी काही महिन्यात होणार असुन लिफ्ट एरिगेशन अर्थात उपसा सिंचनाने हे पाणी गुडीपाडव्यापर्यंत येणार आहे. सीनाकोळेगाव सह अन्य भागात हे पाणी येणार असल्यामुळे इथलं दुष्काळाचा प्रश्न कायमचा मिटणार असुन शेतीचे सिंचन क्षेत्र वाढणार आहे. सत्ता बदल झाल्यानंतर आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी कामांचा प्राधान्यक्रम बदलला त्यामुळे या कामांना गती आली असुन शेतकर्यांची गेल्या अनेक वर्षाची स्वप्नपुर्ती होणार आहे.
जेऊर दहिगाव येथील 27 किलोमीटर बोगद्या पैकी 25 किमीचे काम झाले असुन उजनीतून सीना कोळेगाव धरणात हे पाणी टाकणे शक्य होणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि अवर्षणग्रस्त मराठवाड्यासाठी वरदान ठरणार्या बहुचर्चित कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी वेळोवेळी मंत्री डॉ सावंत यांनी पाठपुरावा केला होता. या प्रकल्पासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले असून, या प्रकल्पांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच प्रकल्पाचे काम पूर्णत्वास येईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.या महत्वपूर्ण कामाबद्दल मंत्री सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महायुती सरकारचे आभार मानले. महायुती सरकारची आणखी एक स्वप्नपुर्ती असुन मंत्री सावंत यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पहिला टप्प्यातील कामांना महायुती सरकारने पुढाकार घेत तब्बल 11 हजार 700 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला. याबाबतीत प्राधान्यक्रम बदलण्यासाठी मंत्रालयात वेळोवेळी बैठका घेऊन अग्रक्रमाने भूमिका मांडून प्राधान्यक्रम बदलून घेतला त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेला आता गती मिळाली आहे.
करमाळा तालुक्यातील जेऊर येथून पुढे धाराशिव जिल्ह्यात जाणारा 27 किमी लांबीचा हा बोगदा असून, आता जवळपास 25 किमी पर्यंतचे काम हे पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यातच उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर उजनीतील पाणी सीना- कोळगाव धरणात यशस्वीरीत्या सोडणे शक्य होणार आहे. तब्बल 7 टीएमसी इतके पाणी या बोगद्याच्या माध्यमातून सीना कोळेगाव धरणात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायमचा मिटणार असून, गेले अनेक वर्ष दुष्काळाच्या झळा सोसलेल्या शेतकरी बांधवांच्या शेतीला या प्रकल्पामुळे नवसंजीवनी मिळणार आहे.
उजनीचे पाणी सीना कोळेगाव या भागात आल्यावर शेतकर्यांसाठी उपसा सिंचन समिती स्थापन करुन शेतकर्यांना पाणी आल्यापासुन 5 वर्ष काळात येणारे प्रतीवर्ष 11 कोटी प्रमाणे 5 वर्षाचे 55 कोटी वीजबील भैरवनाथ साखर कारखाना भरणार असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. पाणी आले म्हणजे समस्या सुटली असे नाही. तलावापासुन 5 ते 10 किलोमीटर अतंरावर लांब शेती असलेल्या शेतकर्यासाठी उपसा सिंचन समित्या स्थापण करून पाणी शेतकर्यांच्या बांधावर पोहचवणार आहे. उजनीचे पाणी आल्यावर या भागात सिंचनाचे क्षेत्र वाढणार असुन हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होणार आहे.या घोषणेमु़ळे शेतकर्यांचा विजबिलाचा ताण कममी होणार असून त्यांना फायदा होणार आहे.
शेतकर्यांना आवाहन, जमिनी विकु नका
पाणी आल्यानंतर सिंचन क्षेत्र वाढणार असून शेतकर्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. अनेक वेळा शेतकरी दहा एकर पैकी एखादी एकर शेती ही पाईपलाईन, विहीर व इतर कामासाठी पैशाची गरज म्हणून विकतात. योग्य वेळी अशा गरजू शेतकर्यांना आर्थिक मदत भैरवनाच्या माध्यमातून करू मात्र शेती विकू नका, असे आव्हान सावंत यांनी केले आहे. भैरवनाथ उद्योग समुह शेतकर्यांच्या नेहमीच पाठीशी राहिला असून शेतकऱ्यांना यावेळीही मदत केली जाणार आहे.