उस्मानाबाद जिल्हा बँकेची निवडणुक बिनविरोध करा – शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत
नवीन राजकीय समीकरण – खासदार ओमराजे व आमदार राणा पाटील एकमेकांशी जुळवून घेणार का ?
कशासाठी सत्तेसाठी, बँक बुडीत मात्र नेत्यांना वारसांची काळजी – कुरघोडीचे राजकारण केव्हा संपणार ?
उस्मानाबाद – समय सारथी
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्तिथी बिकट असल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन शिवसेनेचे उपनेते, संपर्कप्रमुख आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले. बँक बुडालेली असताना ती ऊर्जित अवस्थेत आणण्या साठी प्रयत्न करण्याऐवजी निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण करून काय साध्य होणार आहे असा प्रश्न उपस्थित करित त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन सावंत यांनी केले. जवळपास सर्व नेत्यांची बिनविरोधची मानसिकता सकारात्मक आहे, 95 टक्के फायनल पण झाले आहे मात्र 5 टक्के बोलणी सुरु आहे असे सावंत यांनी सांगितले. 15 जागापैकी 3 जागा या बिनविरोध आल्याने यासह उरलेल्या 12 जागाचा पक्षनिहाय वाटप फॉर्मुला काय आहे किंवा चर्चा काय सुरु आहे ? हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. 10 फेब्रुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे त्यामुळे आगामी 2 दिवस महत्वाचे असणार आहे.
आमदार सावंत यांनी बिनविरोध निवडणुकीचा फॉर्मुला मांडत आदेश दिला असला तरी त्याला शिवसेनेतील नेते कितपत प्रतिसाद देतील हा प्रश्न आहे. खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे राजकीय हाडवैरी आहेत हे सर्वश्रुत आहे. खासदार ओमराजे हे डॉ सावंत यांच्या आदेशावरून आमदार राणा पाटील यांच्याशी जुळवून घेत भाजपला पर्यायाने राणा पाटील गटाला जिल्हा बँकेत सत्तेचा वाटा देणार का हा प्रश्न चर्चीला जात आहे. पत्रकार परिषदेत सावंत यांच्या फॉर्मुलावर खासदार ओमराजे यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने त्यांची नाराजी उघडपणे दिसून येत होती. जिल्हा परिषद सत्तेच्या माध्यमातून आमदार सावंत व आमदार राणा पाटील यांचे स्नेह वाढले असून सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळे सावंत हे राणा यांची मनधरणी चांगल्या प्रकारे करू शकतात मात्र राणा पाटील व ओम राजे यांचा राजकीय वाद बिनविरोध निवडणुकीत मिठाचा खडा ठरू शकतो. ओमराजे व राणा पाटील तसेच सावंत व राहुल मोटे, हे बँकेच्या विकासासाठी एकमेकांचे वाद विसरून एकत्र नवीन राजकीय समीकरणाची सुरुवात करणार का ? हे पाहावे लागेल.दोन्ही दादा सध्या वेट अँड वॉच भूमिकेत आहेत. सावंत यांची राजकीय शिष्टाईचा कस लागणार आहे.
पत्रकार परिषदेला खासदार ओम राजे निंबाळकर, जिल्हा प्रमुख आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, सभापती दत्ता अण्णा साळुंके, केशव सावंत,प्रशांत चेडे, संजय गाढवे उपस्तित होते. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत घराणेशाही व राजकीय नेत्यांच्या वारसांचा भरणा आहे त्यामुळे अनेक जन आपापल्या वारसांच्या व निकटवर्ती नातलगांच्या जागा सुरक्षित करण्यावर भर देत आहेत, त्यात सामान्य कार्यकर्त्यांना स्थान मिळणे तूर्तास तरी दुरापास्त आहे. सावंत यांची पथदर्शी भूमिका जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना पचणी पडणार का ? हे आगामी काळ ठरविणार आहे.
बँक कोण बुडवली ? या इतिहासात न जाता आपण विकासाच्या मुद्यावर भर देणार आहोत. जिल्हा बँकेच्या इतिहासात गेल्यावर व त्यावर चर्चा केल्यावर काही मिळणार नाही. सभासद, शेतकरी यांना निवडणुका हव्या आहेत हा प्रश्न सभासद यांना विचारला पाहिजे. सभासद यांचा निवडणूक बाबत फीड बॅक घेतला पाहिजे. संस्था वाढली पाहिजे या माफक अपेक्षेतून काम सुरु असून त्याच भूमिकेतून बिनविरोध निवडणुका काढाव्यात असे आवाहन आमदार डॉ तानाजीराव सावंत यांनी केले.
सर्व नेत्यांना आवाहन करतो की बँकेची जिल्हा बँकेची अवस्था बिकट आहे शेजारील जिल्ह्यातील बँका 0 टक्केवर कर्ज देतात मात्र आपली बँक बुडाली आहे त्यामुळे कर्ज देणे शक्य नाही. आपली बँक अडचणीत आहे, डबघाईला आहे असे सर्वजण म्हणतात मात्र मग अश्या स्तिथीत जिल्हा बँक निवडणूक लढण्यासाठी 164 अर्ज आले यावरून केवळ राजकारण करायचे आहे हा हेतू स्पष्ट होतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक अवस्था बिकट असून सभासद यांचे हक्काचे डिपॉजिट पैसे सुद्धा देऊ शकत नाही.शेतकरी,विद्यार्थी, मुलींच्या लग्न याला बॅक आर्थिक मदत करू शकत नाही.
जिल्हा बँक अडचणीत आहे तर मग आपन निवडून आल्यावर कशाचा कारभार करणार आहोत. फक्त निवडणुका निवडणुका जर असे राजकारण नको त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.आमची मानसिकता आहे , जनतेचा लोकांची मानसिकता नाही निवडणुका लादू नका असा सूर आहे त्यामुळे बिनविरोधसाठी सर्वांनी पक्षीय बाजू भूमिका बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे.
जिल्हा बँक निवडणुकीत ज्यांनी अर्ज भरले आहेत किंवा जे संचालक होण्यासाठी उत्सुक आहेत त्यातील बँकिंग कळणारे किती आहेत. जिल्हा बँक सुरु करण्यासाठी त्यांच्याकडे विकासाचे मॉडेल आहे का ? आम्ही त्यांच्या हातात विकासाचे मॉडेल देतो. मात्र ज्यांनी अर्ज भरले आहेत किंवा इच्छुक आहेत त्यांनी बँक सहकार क्षेत्रासाठी कुठे व किती योगदान आहे याचे आत्मचिंतन करावे लागेल. जे संचालक होण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना बँकिंग कळते का ? चहा टपरी तरी त्यांनी यशस्वी रित्या चालवली आहे का असा सवाल केला.
बँक कोण बुडवली यावर चर्चा केल्यास सभासद यांचा काही फायदा नाही. मरणावस्थेत असलेल्या बँकेचे संचालक होण्याचं कारण काय , माजी इच्छाशक्ती आहे बँक सुरु करण्याची त्यामुळे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे ज्यावेळी बँक स्तिथी चांगली होईल तेव्हा निवडणुका लढा त्यावेळी आम्ही त्याला समोरे जाऊ मात्र आता निवडणूक लढविण्याची व राजकारण करण्याची ही ती वेळ नाही असे सावंत म्हणाले.
जिल्हा बँक सुरु करा,कुटीर उद्योग , साखर कारखाने सुरु करा.हे जर ताकतीने चालले तर चांगले दिवस येतील ही माफक अपेक्षा आहे. विकासाच्या आड येऊ व राजकारण करू असा ? जिल्ह्यात 24 तास राजकारण करून विकासात अडथळा आणतात. विकास खुंटला पाहिजे यासाठी ते सातत्याने काम करतात याचा प्रत्यय वेळोवेळी यापूर्वी आला आहे.शेजारील लातूर सोलापूर नगर प्रगत आहेत मात्र आपण मागास का ? 30 वर्ष मंत्रीपद असताना काय केले याचा इतिहास उगाळण्याची गरज नाही असे सावंत म्हणाले.
सर्वांनी एकमेकांच्या हातात हात देऊन विकाससाठी एकत्र या, सर्वांनी विकासासाठी पक्ष बाजूला सोडून एकत्र येण्याचे जिल्हा बँक हे एक निमित्त ठरू शकतो. यापासून पुढे जाऊन सर्व पक्षांनी एकत्र यावे बिनविरोध काढावे व पुढच्या 5 वर्षात एकत्र येऊ बँक सुधारावू नंतर निवडणूक खेळू असे म्हणाले. विकास एकदम होत नसतो तो सातत्याने कामे झाल्याने होतो मी रोल मॉडेल तयार करणार आहे.
बिनविरोध निवडणुका झाल्या माहित तर जनता माफ करणार नाही त्यामुळे स्तिथी पाहून ठरवा. जिल्हा बँक सुरु होण्यासाठी जे काही योगदान लागेल ते द्यायला मी तयार आहे. फॉर्म भरायच्या अगोदरपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे आमच्यात चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. काही विषयावर रुसवे फुगवे आहेत. शिवसेनाची बिनविरोध निवडणुका ही भूमिका आहे मात्र तसे झाले नाही तर शेवट इच्छा असो नसो लढावं लढणार असे सावंत म्हणाले. येणारा काळ ठरवेल आम्ही सत्तेत येऊ की मात्र जसाच तसे उत्तर शकत असा इशारा त्यांनी दिला. मी संस्था जिवंत करणारा आहे , मी क्रीटर आहे, मी जिथे स्पर्श करतो तेथे यश मिळते हा इतिहास आहे त्यामुळे आगामी काळात जिल्हा बँक, तेरणा कारखाना सुद्धा पूर्वीचे आहे.
तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याला या पूर्वीचे दिवस नक्की येतील. गेली 10 ते 12 वर्ष कारखाना बंद असताना इतके दिवस कोण गप्प का होते आता जेव्हा आम्ही भैरवनाथने लक्ष घातल्यावर इतर जागे का झाले ? हा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. तेरणेचा मुद्दा हा आता उच्च न्यायलयात असल्याने आता यावर बोलणे उचीत नाही असे ते म्हणाले मात्र तेरणा लवकरच येत्या हंगामात सुरु होईल यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी कोण खो घातला यावर मात्र त्यांनी भाष्य टाळले.