तेरणा कारखान्याचा आज बैठकीत फैसला , 21 शुगर्सबाबत बैठकीपूर्व जोरदार चर्चा
उस्मानाबाद – समय सारथी
जिल्ह्यातील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी आज उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत भैरवनाथ शुगर वर्क्स यांनी वेळेत निविदा सादर केल्याने ती ग्राहय धरली जाणार आहे तर लातूर येथील 21 शुगर्सने वेळेत निविदा सादर न केल्याने ती ग्राहय धरायची की नाही यावर संचालक मंडळात बैठकीपूर्वी जोरदार चर्चा होत आहे. 21 शुगर्सने दिलेल्या निविदा बाबत अनेक कायदेशीर बाबी असल्याने त्यावर काय निर्णय होतो हे पाहावे लागेल. 21 बाबत संचालक मंडळात 2 मतप्रवाह आहेत त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे तर तेरणा संघर्ष समितीचे सदस्य ही तेरणेचा काय निर्णय होतो याकडे डोळे लावून बँकेत ठाण मांडून आहेत.
1 वाजता सुरू होणारी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची बैठक दुपारी 3 वाजले तरी सुरू झालेली नाही. 21 शुगर वरून पेच निर्माण झाला आहे त्यामुळे कायदेशीर चौकटी पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आता वेळ न घालवता निविदा मंजूर करा व तात्काळ कारखाना सुरू करा, अशी मागणी करीत शेतकरी संघर्ष समितीचे सदस्य आक्रमक झाले.